बिडकीनमध्ये दोन अपघात ; तिघे जखमी

Foto
बिडकीन, (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर पैठण महामार्गावर मंगळवारी (ता. ७) सकाळी एका तासाच्या अंतराने दोन वेगवेगळे अपघात झाले. यात तीन जण जखमी झाले. 

त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांचे प्राण वाचले. पहिला अपघात सकाळी ७.४५ ब्या सुमारास फारोळा येथे झाला. दुचाकीला (क्र. एभएच २० बीएफ ६४२६) अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. 

यात कार्तिक अंकुश कातबने (वय २६, रा. बिडकीन, ता. पैठण) हे गंभीर जखमी झाले. दुसरा अपघात सकाळी ८.४५ वाजता बिडकीन येथील डीएमआयसी परिसरात घडला. दुचाकी (क्र. एमएच २० एफजे ०६७७) चालकाचे वाहनावरील नियंत्रण व आकाश संजय नाटविसावे (वय २८, रा. ७४ जळगाव, ता. पैठण) सुटल्याने दुचाकी यात दुभाजकावर आदळली. भगवान विलास जगधने (वय २७) हे जखमी झाले. 

दोन्ही अपघातांची माहिती मिळताच पाटील पार्क, बिडकीन पॉईंटवर तैनात असलेल्या जगगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणीजधाम यांच्या रुग्णवाहिकेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना प्राथमिक मदत देऊन पुढील उपचारासाठी शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.