घाटी रुग्णालयात वैद्यकीय शिक्षणासाठी दोन देहदान प्राप्त

Foto
ग्रामीण भागातूनही देहदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, घाटीच्या शरीररचनाशास्त्र विभागास दोन देहदान प्राप्त झाले. यामध्ये स्व. धोंडीराम सहादू वेताळ (८५), रा. शिवशंकर कॉलनी तसेच स्व. सुभाष राधाजी निकम (७५), मु.पो. वाकला, ता. वैजापूर यांचा समावेश आहे.
अधिष्ठाता डॉ. शिवाजी
सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व विभागप्रमुख डॉ. अर्चना कल्याणकर - तुंगेनवार यांच्या पुढाकाराने मानवतावादी व समाजोपयोगी चळवळीला सातत्याने बळ मिळत आहे. चालू वर्षात आतापर्यंत सुमारे १८, तर २०२३ पासून साधारणतः ९८ देहदान विभागास प्राप्त झाले आहेत. वैजापूरसारख्या ग्रामीण भागातून स्व. सुभाष निकम यांचा देह वैद्यकीय शिक्षणासाठी स्वतः
आतापर्यंत ९८ देह प्राप्त; वर्षभरात १८ जणांचे देहदान
हुन समर्पित करण्यात आला. ही बाब ग्रामीण समाजातही देहदानाबाबत वाढत असलेल्या सकारात्मक जागरूकतेचे
आणि मानवतावादी विचारांचे द्योतक आहे. हे देहदान जगद्रुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या सहकार्याने प्राप्त
कुटुंबीयाबाबत कृतज्ञता
देहदाते व त्यांच्या कुटुंबीयांच्या या उदात्त निर्णयाबद्दल विभागातर्फे कृतज्ञता व्यक्त करून दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली. देहदान प्रक्रियेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विभागातर्फे ऑनलाईन फीडबॅक फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले. देहदानाचे महत्त्व, देहदानाबाबतच्या नागरिकांच्या शंका तसेच देहदान व अवयवदानातील फरक याबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.
झाले.
शरीररचनाशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्रा.डॉ. पल्लवी चव्हाण व डॉ. वैशाली किरवले यांच्या माध्यमातून देहदानाची प्रकिया पूर्ण करण्यात आली. तसेच
विभागीय कर्मचारी मार्टिन, खिल्लारे, मिर्झा बेग व जय यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. देहदात्यांच्या नातेवाईकांना विभागातर्फे देहदान प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions