गंगापूर - भेंडाळा फाटा महामार्गावर दोन कारचा समोरासमोर भीषण अपघात

Foto
एका महिलेचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी

गंगापूर, (प्रतिनिधी) : गंगापूर ते छ. संभाजीनगर गंगापूर फाटा, भेंडाळा फाटा महामार्गावर दोन कारचा अपघात झाल्याची घटना घडली. या प्रयत्नात भरधाव कंटेनरने दोन कारला जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गंगापूर-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील साखर फाटा येथे जिनिंगजवळ घडली.

 यात गंभीर जखमी झालेल्या विद्या राजेंद्र जोशी (वय ५८, रा. आष्टी, जि. बीड) यांचा घाटी रुग्णालयात नेताना मृत्यू झाला, तर दोन गंभीर जखमी, तर तीन जण किरकोळ जखमी झाले. या अपघातात एक कार पलटी होऊन शेतात पडली, तर दुसऱ्या कारचा चक्काचूर झाला.

राजेंद्र अपघातात जयनारायण जोशी (वय ६३), विद्या राजेंद्र जोशी (वय ५८) आणि कलावती जयनारायण जोशी (वय ८०) हे तिघे एकच कुटुंबातले राहणार आष्टी जिल्हा बीड, हे गंगापूर येथील तिवारी परिवाराच्या अमरावतीतील विवाह सोहळ्यासाठी आले होते. शुक्रवारी रात्री ते कार (क्र. एम.एच. २३ ए.डी. ४२५१) ने आष्टीकडे परतत असताना कंटेनरने त्यांच्या कारला धडक दिली. याचवेळी छत्रपती संभाजीनगरहून गंगापूरकडे येणाऱ्या कार (क्र. एम.एच. २० ई. वाय, ३३७३) लाही कंटेनरने धडक दिली. 

या अपघातात जोशी कुटुंबातील तिघे गंभीर जखमी झाले. दुसऱ्या ब्रेझा कारमधील योगेश पंढरीनाथ मनाळ (वय ३५), अनिल वसंत पारखे (वय ३२, दोघे रा. वाहेगाव) आणि चंद्रकांत नामदेव सुंब (वय ५१, रा. मांजरी) हे किरकोळ जखमी झाले. 

त्यांच्यावर गंगापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धडक इतकी भीषण होती की दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाहनांमधील एअरबॅग उघडल्या; मात्र तरीही प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. 

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी निलेश गांधी, तहेर बाकोदा, अलि बागेस, साजिद शेख यांनी जखमींना कारमधून बाहेर काढण्यास मदत केली. खाजगी रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे यांनी गंभीर जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी लक्ष्मीकांत व्यास, मुकुंद जोशी सुलतान शेख यांच्यासह अनेक जखमींना मदत केली.

 प्राथमिक उपचारानंतर तिघांनाही पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले होते. दरम्यान, पुढील उपचारासाठी संभाजीनगरला घेऊन जात असताना विद्या राजेंद्र जोशी (५८) यांचा रस्त्यातच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहे.