पैठण, (प्रतिनिधी) : पैठण शहरातील पैठण पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या महिला समुपदेशन कार्यालयात तक्रारदार यांच्या मुलाच्या लग्न झाल्यानंतर दोन महिन्यातच सून माहेरी गेली होती. तिने महिला समुपदेशन केंद्र कार्यालय पैठण येथे तक्रार दिल्यामुळे प्रकरण सुरू होते. तुमचं प्रकरण पुढच्या तारखेत निपटून टाकते यासाठी दहा हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी कार्यालयातील दोन कंत्राटी महिलांनी केली होती. तडजोडीअंती आठ हजार रुपयात तडजोड झाली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून दोन कंत्राटी समुपदेश महिलांना तक्रारदारा कडून पंचा समक्ष मंगळवारी रोजी संध्याकाळी पाच ते सहा च्या दरम्यान कार्यालयात
आठ हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने रंगेहात पकडले असून दोधी विरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. याबाबत माहिती अशी की पैठणी येथील महिला समुपदेशन कार्यालय पोलीस ठाण्याच्या एका बाजूला महिला समुपदेशन कार्यालयातील कंत्राटी महिला समुपदेशक ज्योती इंदर शेजुळ वय ३८ वर्ष राहणार नवीन कावसान पैठण तसेच विजया यादव भंडारे वय ५२ वर्षे राहणार भीमनगर तालुका पैठण या दोन कंत्राटी महिला या ठिकाणी समुपदेशन कार्यालयात काम करत आहेत तक्रारदाराच्या मुलाच लग्न २०२३ मध्ये झालं होतं. पत्नी भक्ती अशोक अंधारे ही दोन महिने नांदायला गेली होती. त्यानंतर भांडण करून तिच्या माहेरी निघून गेली होती.
तिने महिला समुपदेशन कार्यालय पैठण येथे दि १२ ऑगस्ट २०२३रोजी तक्रारदार व तक्रारदाराच्या मुली यांच्याविरुद्ध शारीरिक मानसिक छळ करतात अशी तक्रार दिली होती सदर प्रकरणात सुनावनी सुरू होती तक्रारदार तारखेवर जात होते. दि.२८ नोव्हेंबर २०२५ रोजी तक्रारदार हे आरोपी महिला समुपदेशन केंद्रातील ज्योती शेजुळ, विजया भंडारे यांच्याकडे गेले असता त्यांनी पुढच्या तारखेला तुमचे प्रकरण मिटवून टाकू परंतु त्यासाठी तुम्हाला दहा हजार रुपये द्यावे लागतीलअशी लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली असता मंगळवारी २३ डिसेंबर रोजी
शासकीय पंच समक्ष लाच मागणीची कार्यवाही करण्यात आली दहा हजाराची लाच मागणी केली.
परंतु तक्रारदाराकडून आठ हजार रुपयाची पुरतता झाल्याने तडजोडीअंती आठ हजार रुपयाची रक्कम मंगळवारी रोजी कार्यालयात पाच ते सहा च्या दरम्यान लाच स्वीकारताना त्यांना पकडले असून दोघींनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असून पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक माधुरी केदार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी संतोष तिगोटे पोलीस निरीक्षक प्रतिबंधक विभाग तसेच तपास अधिकारी राजीव नागलोत पोलीस निरीक्षक यांच्यासह साईनाथ तोडकर, सिनकर पुष्पा दराडे, रामेश्वर ताठे यांनी केली आहे.















