करमाड, (प्रतिनिधी) : सुखना नदीतून अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या भरधाव हायवा टिप्परने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. करमाडः पिंपरीराजा मार्गावरील मंगरूळ फाट्याजवळ रविवारी (ता. २२) दुपारी एकल्ला हा अपघात घडला.
अभिषेक पूनमचंद बिमरोट (वय २६) व अर्जुन काळूसिंग बिमरोट (वय २०, दोघे रा. नागुनीची वाडी) अशी मृतांची नावे असून, प्रकाश कांतीलाल बिमरोट (वय ३०) हे गंभीर जखमी झाले आहेत. हे तिघे दुचाकीने (एमएच २० एचएल ०९७६) नागुनीची वाडी येथून कुंकूः टिळ्याच्या कार्यक्रमासाठी जोडवाडीकडे जात होते. मंगरूळ फाट्याजवळ रेती वाहतूक करणाऱ्या हायवा टिप्पने (क्र. एमएच २० ९३७४) त्यांच्या दुचाकीला जोरात उडवले. धडक इतकी भीषण होती की तिघेही रस्त्यावर ळ फेकले गेले. स्थानिकांनी जखमींना तातडीने घाटी रुग्णाल्ल्यात दाखल केले.
मात्र डॉक्टरांनी अभिषेकला मृत घोषित केले, तर उपचारादरम्यान अर्जुनचाही मृत्यू झाला. जखमी प्रकाशवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अभिषेक हा पिकअप गाडी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि आई -वडील असा परिवार आहे. अभिषेकचा मृत्यू झाल्याने कुटुंबाचा आधार हरपला आहे. तर अर्जुन बिमरोट हा शिक्षण घेत होता. तो अविवाहित होता. करमाडचे पोलिस जमादार प्रशांत नांदवे, संजय सपकाळ, अतुल गीते तपास करत आहेत.













