कन्नड, (प्रतिनिधी) कन्नड तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी आर्थिक विवंचना व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याच्या घटना रविवारी (ता. २२), सोमवारी (ता. २३) उघडकीस आत्त्या, भगवान मौकारो (क्य ५२) व दीपक वाघ (वय ४२), असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.
पिशोर भागातील अल्पभूधारक शेतकरी भगवान पहिल्या घटनेत येथील शफेपुर मोकासे हे रविवारी सकाळी शेतातील गव्हाच्या पिकावर औषध फवारणी करून देतो, असे पत्नी व मुलांना सांगून शेतात गेले होते. त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे दुपारी बारा वाजता आजूबाजूच्या निदर्शनास आले. शेतकऱ्यांच्या त्यांनी तात्काळ पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना घाटी रुग्णालय येथे हलविण्यात आले,
मात्र उपचार सुरू असताना सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. नातेवाईकांच्या माहितीनुसार, बचत गटाचे कर्ज, खाजगी कर्ज यामुळे ते मानसिक तणावाखाली होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. शफेपूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी एका अल्पभूधारक तरुण शेतकरी दुसऱ्या घटनेत, शफियाबाद येथील घरातून कोणालाही न सांगता दीपक वाघ (वय ४२) हे शनिवारी (ता. २१) गेले होते.
नातेवाईकांनी त्यांचा सगळीकडे शोध घेतला. रविवारी ते बेपत्ता असल्याच नोंद पिशोर पोलिस ठाण्यात केली होती. सोमवारी विहिरीत त्यांचा मृतदेह आढळला. नापिकी, नातेवाईकांकडून उसनवारीची तसेच मुलांच्या खाजगी व घेतलेल्या परतफेड, शिक्षण व आर्थिक भविष्यासंबंधीच्या चिंतेमुळे ते मानसिक तणावाखाली होते.











