खुलताबादेत दोघांवर प्राणघातक हल्ला; १० जणांविरुद्ध गुन्हा

Foto
खुलताबाद, (प्रतिनिधी) : येथील जुना बसस्थानक परिसरात शनिवारी (दि.१२) दुपारी दोन वाजेच्या सुमारास झालेल्या हाणामारीत दोघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोघांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात शेख साद मिनाजुद्दीन (वय २९) आणि शेख फहाद सलीमोद्दीन (३०, दोघेही रा. खुलताबाद) हे जखमी झाले आहेत. 

याप्रकरणी जखमी शेख फहाद सलीमोद्दीन (रा. स्टार कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुलताबाद पोलीस ठाण्यात १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी अपरजिता अग्निहोत्री यांनी घटनास्थळी भेट दिली.