सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस - डंपर अपघातात दोन ठार

Foto
सोलापूर : सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील रूद्देवाडी बसस्थानकाजवळ एसटी बस व मुरूमाने भरलेल्या डंपरचा भीषण अपघात झाला. हा अपघात सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. अपघातानंतर डंपरने पेट घेतल्याने दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, याबाबत पोलिसांनी सांगितले की, अक्कलकोट होऊन गाणगापूर कडे जाणाऱ्या बसला रुद्देवाडी बसस्थानकाजवळ मुरूमाने भरलेल्या डंपरने समोरून धडक दिली. या धडकेत एसटी बसचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघातानंतर पुढे जाऊन डंपर उलटला आणि डंपरने पेट घेतला. बसमधील अनेक प्रवासी किरकोळ तर काही प्रवास गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.