खुलताबाद, (प्रतिनिधी) शहरातील बाजार गल्ली परिसरात प्रतिबंधित असलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्याच्या घरावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी छापा टाकून दोन लाख चार हजार रुपये किमतीचा मुद्देमात जप्त केला.
या प्रकरणी पोलिसांनी घराची झडती घेतली असता घरामध्ये एक लाख २७ हजार पाचशे रुपये किमतीचा हिरा, डायरेक्टर आणि ७६ हजार ५०० रुपये किंमतीचे रॉयल ७१७तंबाखू जप्त करण्यात आले. येथील बाजार गल्ली परिसरामध्ये प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैधरित्या विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली.
गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एका घरात छापा मारून दोन लाख चार हजार रुपये किमतीचा जप्त न केला. याप्रकरणी शेख अब्दुल मुजीब चाँदमियाँ वय ३२ वर्षे राहणार बाजार गल्ली खुलताबाद याला अटक करण्यात आली.
गुन्हे शाखेचे पोलिस विष्णू गायकवाड, भागिनाथ आहेर, अशोक वाघ, संजय तांड, अनिल काळे, कासम पटेल, सरला जाधव यांच्या पथकाने बाजार गल्ली परिसरात गुटखा पानमसाला विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावर एका घरात छापा टाकला.
हिरा पानमसाला एका गोणीमध्ये ८५० पॅकेट अंदाजे किंमत एक लाख २७ हजार पाचशे रुपये, रॉयल ७१७ तंबाखूचे ८५० पाकीट अंदाजे किंमत ७६ हजार पाचशे रुपये असा एकूण दोन लाख चार हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. पंचनामा करून गुटखा जप्त करण्यात आला. महाराष्ट्रात गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखूच्या विक्रीवर बंदी आहे. तरीही छुप्या मार्गाने विक्री केली जाते. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने कर्करोग मुखाचे आजार होतात, जे तरुण पिढीचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत.















