अज्ञात वाहनाच्या धडकेत रिक्षातील दोघांचा मृत्यू

Foto
वीस फूट खड्ड्यात कोसळली रिक्षा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): सारोळा रोडवर मंगळवारी रात्री झालेल्या अपघातात रिक्षाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, तर महिला गंभीर जखमी झाली. रिक्षा तब्बल २० फूट खोल खड्ड्यात कोसळली.
चौका परिसरातील तीन जण रिक्षाने सारोळ्याकडे जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपून रात्री साडेदहाच्या सुमारास परतत असताना, कोहिनूर कॉलेजजवळ
अज्ञात वाहनाने त्यांच्या रिक्षाला धडक दिली. धडकेनंतर रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा थेट रस्त्याच्या कडेला सुमारे २० फूट खोल खाली कोसळली. जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना रिक्षाचालक
हरिभाऊ किसन गाडेकर (वय ५८, रा. एन-१३, हडको) आणि गौतम लक्ष्मण पाईकडे (वय ६०, रा. दीक्षाभूमी नगर, हसूल) यांचा मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अलका गौतम पाईकडे यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. फरार वाहनचालकाचा शोध सहायक पोलिस निरीक्षक प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल मुजीब करत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions