गिरजा नदी पात्रात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू; वडोद बाजार परिसरातील घटना

Foto
औरंगाबाद : वडोद बाजार परिसरातील गिरजा नदी पात्रात दोन शाळकरी मुलांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हे दोघेही विद्यार्थी दप्तर शाळेत ठेवून नदी व ओढ्याच्या संगमाजवळ शौचास गेले असताना ही घटना घडली. 

सरस्वती भुवन शाळेत शिक्षण घेणारे तमजील शेख व मिनाज शेख हे दोन्ही विद्यार्थी सातवीच्या वर्गात शिकत असून दुपारी नदी व ओढ्याच्या संगमा जवळ शौचास गेले होते. या ओढ्याच्या खोलीकरणाचे काम सुरू असल्याने पाणी किती खोल आहे. याचा दोघांना अंदाज आला नसल्याने ही दुर्घटना घडली. यापैकी एकाचा पाय घसरून तो संगमात पडला, आपल्या मित्राला वाचवण्यासाठी दुसर्‍याने उडी टाकली परंतु, त्याचा प्रयत्न असफल ठरला. घटनास्थळी एक चप्पल सापडल्याने पोलिसांना संशय आला आणि त्यांना मध्यरात्री एक मृतदेह तर पहाटे दुसरा मृतदेह सापडला. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker