मुंबई : शिवसेना पक्षाचा आज ६० वा वर्धापन दिन असून मुंबईत दोन ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते मेळावे होणार आहेत. षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा तर गोरेगाव नेस्को सेंटर येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात खासदार फुटीमुळे एक वेगळंच राजकीय वलय प्राप्त झालं आहे. ६ खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. तसंच खासदार फुटीच्या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे.
राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असून तब्बल चार वर्षानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. गुरुवारी दिल्लीत झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीला पक्षाचा व्हीप धुडकावून ६ खासदार अनुपस्थित राहिले. हे तेच ६ खासदार आहेत जे बंडखोरी करून शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले असून ते आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार हे निश्चित झालं आहे. राज्यातील या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, १९ जून रोजी दोन्ही शिवसेनेकडून दोन वेगवेगळ्या ठिकाणी वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. पक्षातील मोठ्या उलथापालथेनंतर दोन्ही पक्षातील पक्षप्रमुख नेमकं काय बोलणार? बंडखोरीबाबत काय भाष्य करणार, तर शिंदेसेनेच्या व्यासपीठावर ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेले ते सहा खासदार दिसणार का? या सर्वांकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
मैदान कोण गाजवणार? ठाकरे-शिंदेंच्या मेळाव्यांकडे नजरा
दरम्यान, गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून पक्षाचा ६० वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी अत्यंत भव्य स्वरूपाची तयारी देखील करण्यात आली असून मुंबई, ठाणेसह इतर शहरांमध्ये जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम सायन येथील षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमासाठीही पक्षाकडून जोरदार तयारी सुरू असून, मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन्ही गटांकडून वर्धापन दिनाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू असल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष या कार्यक्रमांकडे लागले आहे. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांच्या नेत्यांची भाषणे आणि भूमिका महत्त्वाची ठरणार आहेत. विशेष म्हणजे पक्षातील बंडखोरीमुळे दोन्ही शिवसेनेच्या मंचावरून नेमकं काय बोललं जातंय हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
खासदार महाराष्ट्रात कधी परतणार?
येत्या १९ जून रोजी गोरेगावच्या नेक्सो सेंटरमध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम होणार आहे. याच कार्यक्रमात हे बंडखोर खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. आता मात्र त्यामध्ये बदल झाला आहे. १९ जून रोजीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये, शिंदेंच्या व्यासपीठावर हे खासदार दिसणार नाहीत. त्यामुळे या खासदारांविना हा कार्यक्रम पार पडणार आहे. बंडखोरी केलेल्या या खासदारांचे मतपरिवर्तन होऊ नये यासाठी त्यांना जयपूरच्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आहे. जयपूरमध्ये सहापैकी चार खासदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर इतर दोन खासदार वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. या सर्व खासदारांना २१ जून किंवा २२ जून रोजी महाराष्ट्रात परत आणण्यात येणार आहे. तोपर्यंत लोकसभेमध्ये त्यांच्या विलिनीकरणाची घोषणा झाली असेल. त्यामुळे त्यांना कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही.
गोरेगाव आणि सायनमध्ये शक्ती प्रदर्शन
शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन दोन वेगवेगळ्या ठिकाणी साजरा होईल. उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम षण्मुखानंद परिसरात होईल. तर गोरेगाव येथे शिंदे सेना शक्तीप्रदर्शन करेल. या दोन्ही ठिकाणी दोन्ही पक्ष त्यांची ताकद दाखवतील आणि शक्ती प्रदर्शन करतील. राज्यातील अनेक जि