आळंदजवळ अपघातात दोघांचा मृत्यू

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): आळंद गावाजवळ शुक्रवारी (दि. २) रात्री भीषण अपघात होऊन छत्रपती संभाजीनगर कडून सिल्लोडकडे येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. 

अपघात शुक्रवार २ ऑक्टोबर रोजी रात्री १० ते ११ च्या दरम्यान आळंद गावाजवळ (ता. फुलंब्री) घडला. मृतांची ओळख पटली असून चांद नबी पटेल रा. आव्हाना रोड सिल्लोड शहर आणि शेख समद अहमद शेख मूळ रा. दौलताबाद ह.मु. गुलशन नगर सिल्लोड अशी मृतांची नावे आहेत. अपघातानंतर नागरिकांनी दोन्ही जखमींना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल केले तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

समद अहमद शेख यांच्यावर शनिवारी, ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता दौलताबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. चांद पटेल यांचा दफनविधी शनिवारी दुपारी सिल्लोड येथे झाला. या अपघात प्रकरणी वडोद बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.