अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) रमजान ईदसाठी कपडे खरेदी करण्यासाठी खंडाळा येथून वैजापूरला जाणाऱ्या युवकांच्या मोटारसायकलला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने २ युवक ठार तर एक जण गंभीर जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्गवरील जरूळ फाटा येथे शनिवारी (दि. २८) फेब्रुवारी रोजी घडली.
खंडाळा येथील अयान (वय (वय रमजान शहा (वय १९) अरमान शरीफ शेख १९) फैजल लाला शेख २०) हे तिघे आपल्या दुचाकी वरून वैजापूरच्या दिशेने येत असताना त्यांच्या दुचाकीला एका वाहनाने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता.

कि, दुचाकीचे पार्ट कित्येक फूट दूर जाऊन पडले. नागरिकांनी तात्काळ त्यांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता वैद्यकीय अधीकारी यांनी तपासून अयान शहा यास मृत घोषित केले व इतर दोन्ही जखमीना घाटी रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.
परंतु प्रकृती गंभीर असल्याने अरमान शेख याची देखील प्राण ज्योत मालावली तर फैजल शेख याच्यावर उपचार सुरु आहे. पवित्र रमजान महिनाचे उपवास सुरु असतात दोन्ही मित्रांचा असा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वैजापूर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास वैजापूर पोलीस करत आहेत.