पैठण, (प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनगर येथील सात विद्यार्थी रविवारी नाथ सागर जलाशय पाहण्यासाठी आले होते, दिवसभर फिरल्यानंतर सायंकाळी हे सर्व नाथसागर जलाशयाच्या किनाऱ्यावर बसून लाटांचा आनंद घेत होते, परंतु यापैकी संकेत खरात व अनिकेत भारती यांना पोहण्याचा मोह आवरला नाही संकेत खरात व अनिकेत भारती हे दोघेजण पाण्यात पोहण्यासाठी उतरले.
परंतु त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडू लागले तेव्हा सोबत आलेल्या मित्रांनी आरडा ओरड केली असता काहीजण त्यांच्या मदतीला धावले. या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु दोघेही पाण्यात बुडाले असल्याची दुर्दैवी घटना रविवारी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मदत पथकाला संकेत खरात यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले तर अंधार झाल्याने जोरदार वारा सुटल्याने दुसऱ्या युवकाचा शोध तात्पुरता थांबविण्यात आला होता. दरम्यान आज सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली असता अनिकेत भारती याचा मृत्य देह शोधण्यात पथकाला यश आले. मृत युवकांची नावे अनिकेत मनू भारती (वय १९, रा. अंबिका नगर, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) व संकेत सिद्धार्थ खरात (वय १८, रा. अंबिका नगर, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) अशी आहेत. घटनेची माहिती या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी पैठण पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पैठण नगर परिषद अग्निशमन दल तसेच स्थानिक पोहणाऱ्या युवकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली होती. शोधकार्यादरम्यान संकेत सिद्धार्थ खरात याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले. मात्र अंधार पडल्याने जोरदार वाऱ्या सुटल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली होती.
आज सोमवारी सकाळी मदत पथकाने पुन्हा शोध मोहीम हाती घेतली असता अनिकेत भारती याचा मृतदेह मिळून आला या दोघांचे मृतदेह येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. दोघांच्याही मृतदेहाचे शव विच्छेदन आज














