चिंचखेडा रस्त्याच्या बाजूला उभ्या ट्रकवर दुचाकी धडकली; २ जण जागीच ठार

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर महामार्गांवरील सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा येथील रस्त्यावर उभ्या ट्रकवर पाठीमागून दुचाकी धडकली असून या अपघातामध्ये २ जण जागीच ठार झाले असून हे दोघेजण निल्लोड येथील रहिवाशी असून या गावात शोककळा पसरली असून दिवसभर घरामध्ये चुली पेटल्या नव्हत्या. 

याबाबत मिळाललेली माहिती अशी कि, निल्लोड येथील कैलास सखाराम मगर (वय ४५ वर्ष) व संजय बारीकराव खटाळ (वय ३५ वर्ष, हे दोन्ही रा. निल्लोड, माणिकनगर) येथील हॉटेल गुरु बिअरबार कामाला होते. त्यांनी सोमवारी सायंकाळी सुमारे ११ वाजेच्या दरम्यान हे हॉटेल बंद करून निल्लोड येथील त्यांच्या घरी दुचाकी (क्रमांक एम एच २० एफ एच १४१३) ने बसून जात असतांना छत्रपती संभाजीनगर महामार्गांवरील चिंचखेडा येथील हॉटेल प्रीतीच्या बाजूला पाण्याचे काळे पिव्हीसी पाईप ने भरलेला ट्रक क्रमांक एम एच १६ सी सी ४९४५ वरील चालक ट्रक उभी करून गाडीची टायर ची हवा चेक करण्यासाठी थांबला होता.

असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. यावेळी ट्रकच्या पाठीमागून हि दुचाकी धडकली असल्याने व यादरम्यान मोठा आवाज झाल्याने स्थानिक नागरिकानी जवळ जाऊन पहिले तर ट्रकच्या पाठीमागील टायरजवळ हे दुचाकीसह हे २ जण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसल्याने यावेळी या नागरिकांनी या दोघाना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. त्यांच्यावर दुपारी निल्लोड गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. असून या घटनेने निल्लोड गावावर शोककळा पसरली आहेत. या घटनेमुळे या गावात दिवसभर चूल पेटली नाही. या घटनेची वडोदबाजार पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
 
दुभाजकाच्या लहान उंचीमुळे डोळ्यावर पडणाऱ्या समोरील वाहनाच्या प्रखर उजेडामुळे अपघात झाल्याची शक्यता छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर सिमेंट रस्त्यावर मध्यभागी उभारलेल्या दुभाजकाची उंची ३ फुटपर्यंत असल्याने दोन्ही बाजूने रात्री येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकी, कार चालकाच्या डोळ्यावर समोरून येणाऱ्या वाहनाच्या दुभाजकाच्या लहान उंचीमुळे डोळ्यावर पडणाऱ्या समोरील वाहनाच्या प्रखर उजेडामुळे समोर चालणारे वाहन किंवा रस्ता दिसत नाही. यामुळे हा अपघात अपघात झाल्याचे शक्यता नाकरता येत नाही. तरी संबंधित विभागाने याची दखल घेऊन या महामार्गावरील दुभाजकाची उंची वाढवण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

--- घरातील कर्ते गेले ---
निल्लोड येथील हॉटेलवर काम करून आपला परिवाराचा उदरनिर्वाह करणारे कैलास सखाराम मगर पश्चात वडील, २ भाऊ, भावजय, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहेत. व संजय बारीकराव खटाळ यांच्या पश्चात आई वडील १भाऊ, भावजय, पत्नी २ मुले असून या दोघाची घरची परिस्थिती गरिबीची असल्याने परिवारकची जबाबदारी या दोघांवार असल्याने त्यांच्या निधनाने या दोन्ही घरातील कर्ता गेल्याने मगर व खटाळ परिवाखर दुः खाचा डोंगर कोसळला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहेत.