वैजापूर, (प्रतिनिधी) : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात लासुर स्टेशन ते शहाजतपूर रोडवर शहाजतपूर शिवारात ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता घडली.
काकासाहेब आसाराम जाधव (३२) रा जळगाव हे या अपघातात जखमी झाले.
जाधव हे दुचाकीवरुन जातविना होते. त्यावेळी क्रमांकाच्या ट्रक्टर चालकाने दुचाकी ला धडक दिली. या अपघातात जाधव जखमी झाले. या प्रकरणी काकासाहेब जाधव फिर्यादीवरून ट्रक्टर चालकाविरूद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात यांनी दिलेल्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार किरण गोरे हे करीत आहेत.












