नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धाच्या झळा भारताला बसायला लागला आहे. भारतीय जहाजांवर आता हल्ले केले जात आहेत. 24 तासांत दुसऱ्यांदा भारतीय जहाजावर हल्ला करण्यात आला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एमटी जलवीर या जहाजावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. ओमानजवळ असणाऱ्या या जहाजाला टार्गेट करण्यात आलं आहे. हा हल्ला इराणकडून झाला की अमेरिकेकडून याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या दोन्ही देशांच्या युद्धात आता भारताचं मोठं नुकसान होत आहे.
याआधी अमेरिकेकडून भारतीय जहाजावर हल्ला करण्यात आला होता. पलाऊचा ध्वज असलेल्या 'एमटी सेतेबेलो या व्यापारी तेलवाहू जहाजावर ओमानच्या किनाऱ्याजवळ आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ भीषण हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे जहाजाच्या इंजिन रूममध्ये आग लागली होती. या व्यापारी जहाजावर एकूण २४ भारतीय कर्मचारी होते. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) माहितीनुसार, तात्काळ कारवाईमुळे आतापर्यंत २१ भारतीयांना सुखरूप वाचवण्यात आले आहे, तर ३ भारतीय नागरिक बेपत्ता होते. त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून एकाचा अद्याप शोध सुरू आहे.
ओमानमधील भारतीय दूतावास, स्थानिक अधिकाऱ्यांच्या सहकार्याने, बेपत्ता कर्मचाऱ्यांसाठी सतत शोध आणि बचाव मोहीम राबवत आहे. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना (IMO) आणि भारताने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
आता पुन्हा एकदा दुसऱ्या जहाजावर हल्ला आहे. अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा युद्धसंघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही देशांनी सगळे नियम मोडून पुन्हा युद्ध सुरू केलं आहे. अनेक जण अडकल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे तणावाची परिस्थिती आहे.