चाकू हल्ल्यातील जखमी उबाठा उपतालुका प्रमुखाचा मृत्यू

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : चाकू हल्ल्यात जखमी झालेले शिवसेना ठाकरे गटाचे शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्ण ऊर्फ किशन कुचरूलाल राठोड (६५, रा. बजाजनगर) यांचा बुधवारी (दि. २०) दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मार्चमध्ये कामगार चौकाजवळ राठोड यांच्यावर झालेल्या चाकूहल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. अनेक दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. मात्र पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली, त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपींवर खुनाच्या गुन्ह्याचे कलम वाढविण्यात
रामेश्वर गाडे यांनी दिली. ९ मार्च रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास वाळूज एमआयडीसीतील कामगार चौक परिसरात तीन तरुणांनी कृष्णा राठोड व त्यांचे बंधू मुकेश कुचरूलाल राठोड (वय ५५) यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात किरकोळ वादातून हा हल्ला झाल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी सुनील सुभाष गाढे (वय २३, रा. साऊथ सिटी, सिडको वाळूज महानगर), कृष्णा राजू वैरागल (वय २१, रा. हर्मूल सावंगी) आणि श्याम संतोष भालेराव (वय २१, रा. हर्सल सावंगी) या तिघांना अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
आल्याची माहिती पोलिस निरीक्षक
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions