छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने काळ्या फिती लावून सोमवारी निराला बाजार चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. पोलिस आणि शिवसैनिकांमध्येही झटापटही झाली. आंदोलनादरम्यान आ. अंबादास दानवे आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. निराला बाजार चौकात शिवसैनिकांसोबत जोरदार घोषणाबाजी करत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनामुळे
Klub Fox अि
वाहतूक खोळंबा झाला. यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये मोठी झटापट झाली. अखेर पोलिसांनी दानवे यांना ताब्यात घेऊन
क्रांती चौक पोलिस ठाण्यात नेले. तेथे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions















