हसूल जेलमध्ये रवानगी; परिसरात भीतीचे वातावरण
छत्रपती संभाजीनगर, : (सांजवार्ता ब्युरो) शिवाजीनगर भागातील एका नामांकित शाळेसमोर सकाळी ७ वाजेच्या सुमारास एका १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा भररस्त्यात हात पकडून तिला शिवीगाळ व धमकी दिल्याचा प्रकार घडला. या प्रकरणातील सराईत गुन्हेगार संदेश गणेश खडके ऊर्फ चिंग्या (१९, रा. भारतनगर, गारखेडा परिसर) याला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याची हर्सल मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पोलिसांनी दिलेल्या १४ माहितीनुसार, पीडित
घाबरलेल्या मुलींची शिक्षकांकडे धाव !
▶ हा प्रकार घडल्यानंतर दोन्ही मुली प्रचंड घाबरल्या होत्या. त्या रडत रडतच शाळेत पोहोचल्या. शिक्षकाने त्यांना रडण्याचे कारण विचारले असता मुलींनी घडलेला प्रसंग शिक्षकांना सांगितला. शिक्षकांनी मुलीच्या मामाला फोन लावून दिला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी थेट पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोक्सोसह अन्य कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक राजेंद्र मुंढे, उपनिरीक्षक अर्जुन राऊत यांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. अॅट्रॉसिटीचे कलम वाढल्याने तपास सहायक आयुक्त मनीष कल्याणकर करत आहेत.
चिंग्याचा भाऊही गुन्हेगार
▶ मुलीची छेड काढणारा आरोपी संदेश खडके हा नशेखोर असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही शहरात घरफोडी आणि लुटमारीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, त्याचा भाऊ पिन्या खडके हा देखील कुख्यात गुन्हेगार असून पोलिस आयुक्तांनी नुकतीच त्याच्यावर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई केली आहे. तो चंद्रपूर येथील कारागृहात स्थानबद्ध आहे. तर इकडे संदेशच्याही गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे.
वर्षीय मुलगी ही शिवाजीनगर येथील एका शाळेत इयत्ता १० वीत शिक्षण घेत आहे. सोमवारी (दि.२४) सकाळी ७ वाजेच्या सुमारास ती १६ वर्षीय मैत्रिणीसोबत पायी शाळेत जात होती. शाळेच्या
अलीकडेच आरोपी संदेश खडके हा पाठीमागून दुचाकीवर आला.
त्याने या अल्पवयीन मुलीला उद्देशून, 'माझ्या सोबत चल, तुझ्यासोबत बोलायचे आहे,' असे म्हणत अचानक
तिचा हात पकडला. तिने त्याच्यासोबत येण्यास नकार दिला. संतापलेल्या संदेशने तिला रस्त्यातच शिवीगाळ केली आणि तुला नंतर बघतो अशी धमकी देऊन तो तेथून निघून गेला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions









