मावस भावावर शेतीच्या वादातून कोयत्याने हल्ला

Foto
 बिडकीन, (प्रतिनिधी) : पैठण तालुक्यात कौटुंबिक वादातून रक्तरंजित घटना समोर आली आहे. गंगापूर परिसरातील शेती विक्रीच्या वादावरून मावस भावाने दुसऱ्या भावावर कोयता आणि दगडाने जीवघेणा हल्ला केला.

ही घटना गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास बिडकीन ते फारोळा गावानजीक महामार्गावरील पुलाजवळ घडली. या हल्ल्यात रामेश्वर हरिश्चंद्र लव्हाळे (वय ४०, रा. गणोरी, ता. फुलंब्री) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डाव्या पायाला फॅक्चर झाले आहे.

जखमी रामेश्वर यांच्या नावे असलेली शेती विकत घेण्यासाठी त्यांचा (वय ३०, रा. भोयगाव, ता. गंगापूर) मावस भाऊ सोमनाथ नवनाथ शिंदे नकार दिल्याने आरोपीने राग मनात हा तगादा लावत होता. रामेश्वर यांनी धरला होता. गुरुवारी सायंकाळी रामेश्वर काम आटोपून दुचाकीवरून जात असताना, सोमनाथने त्यांच्या दुचाकीला लाथ मारून पाडले. त्यानंतर हातातील कोयत्याने पायावर वार करत दगडाने बेदम मारहाण केली.

महामार्गावरील वाहनधारकांनी मध्यस्थी जखमीची सुटका केली व बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रामेश्वर लव्हाळे यांच्या फिर्यादीवरून बिडकीन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.