प्रशासनाला आंदोलनाचा चटका, आंदोलनानंतरच वसुसायगाव शाळेला मिळाला शिक्षक
गंगापूर पंचायत समितीतच भरली शाळा
गंगापूर, (प्रतिनिधी) तालुक्यातील वसुसायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या अभावामुळे विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी शुक्रवारी (दि. १०) सकाळी ११ वाजता पंचायत समिती गंगापूर येथे धडक देत कार्यालयातच शाळा भरवली.
या वेळी विद्यार्थ्यांनी खिचडी बनवून आंदोलन केले. आणि शिक्षण खात्याचे लक्ष वेधले. या आंदोलनाला जिल्हा परिषद समापती तथा लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष जाधव यांनी पाठिंबा दर्शवला. त्यांनी इशारा दिला की, जर शाळेला तात्काळ शिक्षक न दिल्यास, आम्ही विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देऊ. दिलेल्या निवेदनानुसार, वसूसायगाव शाळेत एकूण १५५ विद्यार्थी आहेत. ७ शिक्षक पदे मंजूर, मात्र सध्या फक्त तीनच शिक्षक कार्यरत आहेत. जानेवारी २०२५ पासून एक शिक्षक अनुपस्थित आहेत. मुख्याध्यापक पद रिक्त आहे. उर्वरित शिक्षक आळीपाळीने रजा घेत असल्याने विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे.
शालेय शिक्षण समितीने केलेल्या मागण्या :
शालेय शिक्षण समितीने मागणी केली आहे की मुख्याध्यापक पद तात्काळ भरावे, अनुपस्थित शिक्षकांना कार्यमुक्त करावे, प्रतिनियुक्त शिक्षकाऐवजी कायमस्वरूपी शिक्षक नियुक्त करावेत, शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट न देता अभिप्राय नोंदवल्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करावी. या आंदोलनात शालेय शिक्षण समिती अध्यक्ष नामदेव मोरे, माजी सरपंच सुनौल नरोडे, बाबासाहेब ठोकळ, नारायण शेळके, रामहरी नरोडे, ज्ञानेश्वर शेलार, बंडू गवारे, सोमीनाथ धनेधर, बाळू शेजवळ, अण्णाभाऊ नरोडे यांच्यासह मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांच्या या अनोख्या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे. शिक्षण विभागाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
आंदोलनानंतरच वसुसायगाव शाळेला शिक्षक वसुसायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या
अभावावरून पालक आणि ग्रामस्थांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर अखेर प्रशासनाने शाळेला शिक्षक जाग आली आहे. या अनोख्या संतोष जाधव यांनी आंदोलनानंतर प्रशासनाने तातडीने हालचाल करत शाळेला शिक्षक नेमल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांनी दाखवून दिले की, एकत्रितपणे लढा दिल्यास बदल शक्य आहे.