अज्ञात चोरट्याने ३ लाखांचे दागिने पळवले

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील आसडी येथील एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरातून कुणी तरी पाळत ठेवून ३ लाखांचे दागिने असलेले पिशवी पळवल्याचे घटना आसडी येथे १० डिसेंम्बर ते २४ डिसेंम्बर दरम्यात घडली या प्रकरणी रविवारी २८ डिसेंम्बर रोजी सायंकाळी ५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

सारजाबाई काशिनाथ मिरगे वय ७५ वर्ष रा. आसडी ता. सिल्लोड या महिलेच्या घरात चोरी झाली आहे सारजाबाई व त्यांचे पती हे दोघे आसडी येथे एका साधारण पत्र्याच्या घरात राहतात त्यांनी १० डिसेंम्बर रोजी अंगावरील दागिने पोत व पुतळ्या एका कापडी पिशवीत काढून ठेवून पिशवी घरातील खुंटीला लटकावली होती. त्यावर इतर अंगावरील कपडे झाकले होते. 

पण कुणी तरी अज्ञात इसमाने लबाडीच्या इराद्याने १० डिसेंम्बर ते २४ डिसेंम्बर दरम्यान ती पिशवी गायब केली. २४ डिसेंम्बरला जेव्हा सारजाबाई ती पिशवी बघायला गेली असता दागिने असलेली पिशवी त्यांना गायब दिसली त्यांनी अजून घरात इतरत्र पाहणी केली पण ती दागिने असलेली पिशवी सापडली नाही म्हणून त्यांनी या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला.