औरंगाबाद: मागील ७२ वर्षांपासून आपला समाज सत्तेपासून वंचित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधारी आपल्याला केवळ झुलवत आले आहेत. त्यामुळे जर वर्षानुवर्षे सत्तेपासून वंचित असलेल्या समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला सत्तेत यावेच लागेल असे प्रतिपादन वंचित आघाडीचे संस्थपाक प्रकाश आंबेकर यांनी म्हटलं आहे. ते गोर बंजारा समाजतर्फे आयोजित सत्ता संपादन व पक्षप्रवेश सोहळ्यात बोलत होते.
राधाकृष्ण् मंगल कार्यालयात झालेल्या या मेळाव्याला खा. इम्तियाज जलील हे प्रमुख पाहुणे तर अँड प्रकाश आंबेडकर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी मंचावर राजपालसिंग राठोड, मनसेचे जि.प. सदस्य विजय चव्हाण, प्रल्हाद राठोड, कृष्ण बनकार यांसह विविध नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
याआधीही आपली संघटन कार्यकारत होती. मात्र, तेव्हा आपल्याला अपेक्षित यश मिळाले नाही. आपण केवळ यशापयशाच्या चक्रात अडकलो. आता, मात्र आपल्याला संधी असून हि संधी वाया घालवायची नाही असा निर्धार प्रत्येकाने करावा असे आवाहन यावेळी त्यांनी केली. समाजात द्वेष पसरवणाऱ्या काही शक्ती साध्य कार्यरत आहेत. धर्माचा वापर द्वेष पसरवण्यासाठी केला जात आहे. देशभक्तीचा दिखावाही मोठ्या प्रमाणात चालू आहे. पण आपल्याला या सर्वांना बळी पडायचे नाही. आपला उद्धार आपल्यालाच करायचं आहे असा निर्धार त्यांनी यावेळी केला.
वंचितचे २८८ उमेदवार जाहीर होईपर्यँत काँग्रेसला ४० जागांची कायम...
यावेळी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासंबंधी बोलताना अँड आंबडेकर म्हणले काँग्रेसला जागा मागण्याचा प्रश्नच नाही लोकसभेनंतर आमची ताकद वाढली असून आमचे उमेदवार निश्चित होईपर्यँत काँग्रेसला ४० जागांची ऑफर कायम आहे असं अँड आंबेडकर म्हणले. भ्रष्टाचार आणि चुकीच्या धोरणांमुळे काँग्रेस राष्ट्र्रवादी मधून आऊट गोइंग सुरु आहे. आमची खरी लढत ही आता सेना भाजपाशीच आहे असेही ते म्हणाले.
३० बंजारा संघटनांचा वंचिताला पाठिंबा...
बंजारा समाजातील ३० विविध संघटनांनी यावेळी आपण वंचित आघाडीसोबत असल्याचे सांगितले. यानंतर राजपालसिंग राठोड, मनसेचे जि.प. सदस्य विजय चव्हाण, प्रल्हाद राठोड, कृष्ण बनकार यांसह विविध नेते व पदाधिकाऱ्यांनी वंचित आघाडीत जाहीर प्रवेश केला.