वैजापूर तालुक्यात अवकाळी पाऊस; वादळी वाऱ्याने पत्रे उडाले

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील अनेक भागात रविवारी सायंकाळी सहा वाजता वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी वीज पडून दोन गायी दगावल्या तर शेतीचेही मोठे नुकसान झाले. रविवारी सायंकाळी सहाच्यानंतर अचानक पावसाने हजेरी लावली. परसोडा येथील कवडेवस्ती येथे अनेक ठिकाणी विजेच्या खांब तसेच कांदा चाळीवरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले. 

शेतकरी सुनील कवडे यांचे मका पिकांचे नुकसान झाले. फुलसिंग राजपुत, नारायण कवडे, काकासाहेब कवडे, मदनभाऊ नागलीत यांचे राहत्या घरावरील पत्रे उडून धान्य महालगावात दोन गायी दगावल्या, शेतीचेही मोठे नुकसान
भीजल्याने मोठे नुकसान झाले. तसेच चिचडगाव येथील राधु पाटील बारहाते यांच्या घराजवळ नारळाच्या झाडाजवळ वीज पडली तसेच बोरस गावात चांगल्या प्रकारे पाऊस शेताला शेततळड्याचे स्वरूप आले होते. जवळपास ३० मिनिटे झालेला पावसाने शेतकऱ्यांची एकदम चांगलीच धादलं उडाली. संजरपुरवाडी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे-नाले वाहू लागले.

काही काळ परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. जोरदार वाऱ्यामुळे विद्युत वाहिन्यांचे नुकसान झाल्याने अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित झाला. महालगाव येथे संध्याकाळी अवकाळी पावसाचे आगमन झाले. येथील शेतकरी पुंजाजी रुंजाजी अल्हाट यांच्या शेतात बांधलेल्या दोन गाईवर वीज पडल्याने त्या दगावल्या. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे मोडून पडली काही वेळ वीज ही गायब झाली होती. या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले.