अवकाळी पावसाने कापसाचे पांढरे सोने काळवंडले

Foto
अवकाळी पावसाने कापसाचे पांढरे सोने काळवंडले

शेरोडी अंबेलोहळ परिसरातील शेतकरी सततच्या पडण्यारा पावसाने हैरान

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो), माळीवाडा : शेरोडी अंबेलोहळ (ता. गंगापूर), अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा हाल केले आहेत. गंगापूर तालुक्यातील शेरोडी अबेलोहळ येथील शेतकरी किरण अशोक गिराम यांच्या शेतातील कापूस पावसामुळे ओला होऊन काळा पडला आहे. सततच्या पावसामुळे कापसाची गुणवत्ता घसरली आहे. शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
या पावसामुळे शेतातील पिके ओलाव्यामुळे खराब होत आहे. कापूस सुकण्याऐवजी कुजण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. शेतकरी किरण गिराम म्हणाले,
आमच्या शेतातील कापूस पावसामुळे ओला झाला. वारंवार पाऊस पडल्याने सुकवणेही शक्य होत नाही. पांढरे सोने काळे पडले आहे. यामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे. मजूर न मिळाल्याने परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची अशीच अवस्था झाली असून, कापसाचे उत्पादन आणि गुणवत्ता दोन्हीवर मोठा परिणाम झाला आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेरोडी अबेलोहळ पंचक्रोशीतील शेतकरी रामदास प्रधान सुनिल प्रधान, अरुण प्रधान, रवि प्रधान, अमोल बरबडे, अशोक बनकर, विलास गवळी, रामेश्वर प्रधान या शेतकऱ्यांकडून होत आहे.