पैठण, (प्रतिनिधी) : पैठण शहरासह ग्रामीण भागात जोरदार वारा व विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली या वादळी वाऱ्यामुळे पैठण शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. उकाड्यामुळे लहान बालके वयोवृद्ध महिला पुरुष तसेच आजारी रुग्णांचे हाल झाले आहे.
तब्बल एक ते दीड तासानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. या अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या अवकाळी पावसामुळे थोडा दिलासा मिळाला असून रात्री गार वारा सुटला होता. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोळमडून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी आंब्याच्या कैऱ्या गळून पडल्या त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.












