छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या भव्य पुतळ्यांचे अनावरण

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) ग्रामदैवत श्री मंगळेश्वर भगवान व श्री मांगिरबाबा संस्थानच्या पावन नगरीत, मंगरुळ (ता. सिल्लोड) येथे मंगळवारी (दि. १७) सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांच्या भव्य पुतळ्यांचा अनावरण सोहळा ऐतिहासिक थाटात झाला.

भांगशीमाता गडाचे प. पु. १००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरीजी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने आयोजित या सोहळ्यासाठी संपूर्ण मंगरुळनगरी सजली असून परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. या सोहळ्याचे उद्घाटन महंत प. पु. श्री ओंकारगिरीजी महाराज (केळगाव), पिठाधीश्वर १००८ महंत बालयोगी स्वामी जगन्नाथ गिरीजी महाराज (सारोळा), महंत प. पु. स्वामी कृष्ण गिरीजी महाराज (आमसरी), बालयोगी प.पु. श्री सर्वानंद सरस्वती महाराज (धानोरा फाटा) आणि महंत प. पु. श्री दिगंबर बाबा (सिल्लोड) या साधू महंतांच्या शुभहस्ते होणार आहे.

या अनावरण सोहळ्यानंतर बुधवार, (दि. १८ फेब्रुवारी) रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत अभिषेक सोहळा पार पडला. त्यानंतर दुपारी ४ ते ५ या वेळेत भव्य हिंदू मेळावा आयोजित करण्यात
या वेळेत सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.

आले आहे. या मेळाव्याला गोदावरी धाम (सराला बेट) चे महंत प.पु. श्री रामगिरीजी महाराज यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. रा. स्व. संघाचे प्रांत प्रचारक स्वप्नील चामणीकर हे या मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतील. मेळाव्यानंतर सायंकाळी ५ ते ८ कार्यक्रमाच्या सांगता दिनी गुरुवारी (दि. १९) फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून सायंकाळी ५ वाजता भव्य दिव्य मिरवणूक व पालखी सोहळा काढण्यात येणार आहे.

 या तीन दिवसीय मंगलमय सोहळ्यासाठी समस्त मंगरुळ ग्रामस्थ मंडळींनी जय्यत तयारी केली असून, परिसरातील शिवप्रेमी, धारकरी व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विनीत समस्त गाकरी मंडळी, मंगरुळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.