रस्त्यांच्या कामासाठी एमएसआरडीसी, एमआयडीसीचा निधी वापरा

Foto

पालकमंत्री देसाई यांची मनपा अधिकार्‍यांना सूचना

 शहरांतर्गत रस्त्यांसाठी महानगरपालिकेने एमएसआरडीसी तसेच एमआयडीसीचा निधी वापरावा, अशा सूचना उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिल्या. पालकमंत्र्यांनी आज सकाळी 11 च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात मनपाच्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपाचे मुख्य अभियंता सखाराम पानझडे यांच्यासह इतर अधिकार्‍यांची उपस्थिती होती.
 दोन दिवसांच्या दौर्‍यावर आलेल्या पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मनपाच्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. पाणीपुरवठा घनकचरा यासह रस्त्यांची कामे तसेच प्रधानमंत्री आवास योजने संदर्भातील कामांची माहिती घेतली. कोरोना संसर्गाच्या काळात सरकारचे सर्व लक्ष आरोग्य यंत्रणेवर आहे.  तरीही मनपाने विकास कामांना गती देऊन वेळेत कामे पूर्ण करावीत. शहरातील रस्त्यांच्या कामाचा दर्जा वेळोवेळी तपासावा, त्याचबरोबर कामांसाठी एमएसआरडीसी तसेच एमआयडीसीचा निधी महानगरपालिकेने वापरावा अशा सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी अधिकार्‍यांना दिल्या.