कन्नड, (प्रतिनिधी) : येथील स्वामी विवेकानंद चौक परिसरातील दत्त मंदिर गल्लीत एका घराला लागलेल्या आगीत संसार उपायोगी - साहित्य न जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली दरम्यान , नागरिकांनी वेळीच ही आग आटोक्यात आणली.
या आगीत गणेश उखर्डे व शांताबाई अंबेकर यांच्या व घराचे नुकसान झाले असून दोघांचेही संसार उपयोगी साहित्य र आगीत भस्मसात झाले आहे. आग लागल्याची घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी मुकुंदा वैष्णव यांच्या हौदातील पाणी मोटर
लावून नळीने आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले विशाल उर्फ विकी सोनगिरे या तरुणाने पाईपाच्या साहयाने जिवाची बाजी लावून पत्रावर चढून पाण्याची नळी हातात धरून आग विझविण्यास मोठी कामगिरी बजावली त्यामुळे हि आग आटोक्यात आली नस्ता खूप मोठी दुर्घटना आज घडणार होती.
अंबेकर यांच्या घराच्या शेजारी लाकडी मकान असून जर का ही आग घरात घुसली. अस्ती तर दोन्हीही घरे कुलूप बंद होती व या घरांमध्ये गॅसच्या टाक्या भरलेल्या होत्या या टाक्यांचा जर स्पोर्ट झाला असता तर आज मोठा अनर्थ घडला असता. तरुणांनीतर कथा म्हणून घरांच्या कृलपा तोडून घरातील गॅसच्या टाक्या उचलून बाहेर आणून ठेवल्या होत्या.
या प्रसंगी हेमंत सोनगिरे, अमोल अंबेकर, बबलू मोकासे, विकास जाधव, पपू जाधव आदिंसह महिलांनी मोठ्या प्रमाणत सहकार्य केले. तर समाजीक कार्यकर्ते राजू मोकासे यांनी तलाठी के. के. बहुरे यांना बोलावून पंचनामा केला आहे.













