वैजापूर : डॉ. दिनेश परदेशी नगराध्यक्ष

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) : नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे डॉ. दिनेश परदेशी हे विजयी झाले. त्यांनी शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे यांचा ६ हजार २४८ मतांनी पराभव केला. नगरसेवकपदाच्या २५ जागांपैकी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार महायुतीला १५ जागा मिळाल्या. यात ४ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या. तर शिवसेनेचे १० उमेदवार विजयी झाले.

विजयी उमेदवार पुढील प्रमाणे : 
बक्ष शेख सुमैय्या सोहेल बक्ष शेख राष्ट्रवादी (अजित पवार), पारस अंबादास घाटे शिवसेना, मोनाली गणेश खैरे (भाजप), डॉ. दिनेश परदेशी वैजापूरचे नगराध्यक्ष, विशाल जिवनलाल संचेती (भाजप), पुजा अविनाश त्रिभुवन (राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार), शेख रियाज अकिल गब्बू शेख (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार), स्वप्नील विष्णू जेजूरकर (मिंधे गट), संगीता राजूसिंग राजपूत (भाजप), जयश्री सावन चौधरी शिवसेना सुवर्णा विजय (उल्हास) ठोंबरे राष्ट्रवादी (अजित पवार), राजेश बळवंता गायकवाड (भाजप), जयश्री दिनेश राजपूत (भाजप), कविता बाळासाहेब शिंदे (भाजप), साबेर खान अमजद खान (शिवसेना) मिंधे गट), दिपा विनोद राजपूत (भाजप), ताहेर साबेर खान (सुल्तान खान, शिवसेना), राहुल कारभारी त्रिभुवन (मिंधे गट), सविता शैलेश चव्हाण (भाजप), लता लिमेश वाणी (भाजप), बाबासाहेब सुखदेव पुतळे (शिवसेना) सय्यद अमीर अली महेबुब अली (मिंधे गट), सुरेखा सुरेश घाटे (शिवसेना), ज्योती अनिल जोशी (भाजप), कुरेशी शेख हमीद शेख हुसेन (शिवसेना), २५) दशरथ भगवान बनकर (भाजप) असे उमेदवार निवडून आले आहेत.