वैजापूर, (प्रतिनिधी) : मार्च एन्ड महिना जसा जसा समाप्त होत आहे तसा तसा वैजापूर नगर पालिका प्रशासनाणे मालमत्ता कर वसुली साठी आक्रमक पवित्रा घेतला आहे
मा. मुख्याधिकारी याचे आदेशानुसार आज पुन्हा एकदा शुक्रवारी (दि. २७) रोजी वैजापूर नगरपालिकेने थकबाकीदारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून मार्च महिन्यातील तिसऱ्या टप्प्यात जप्ती मोहिमेला सुरुवात केली आहे. सदर जप्ती मोहिमे अंतर्गत शहरातील नवीन भाजी मंडी मधील दोन गाळे सील करणेत आले आहे. तसेच एक गाळेधारकाकडून ९००० व दुसऱ्या गाळेधारकाकडून ५०, ००० असे एकूण ५९, ००० रूपयांची थकबाकी वसूल केली. तसेच शहरातील बाळासाहेब शॉपिंग सेंटर मधील एक असे एकूण तीन गाळे सील करून ताब्यात घेतले आहेत.
वारंवार नोटिसा देऊनही प्रतिसाद न देणाऱ्यांवर थेट कारवाई करणेत येत आहे तसेच नगर परिषदेची ज्याचेकडे थकबाकी आहे त्यांनी नगर परिषेदेचे वसुली कर्मचारी घरोघरी भेट देत असून नागरिकांनी त्यांचेकडील कराची रक्कम भरावी व नगर परिषदेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाचे वतीने करणेत आले आहे. पालिकेने मालमत्ता कर, पाणीपट्टी, गाळे भाडे थकबाकीदारांवर कारवाई हाती घेतली आहे. तसेच पाणीपट्टी न भरलेल्या घरांचे नळ कनेक्शन बंद करणेत येत आहे. शहरातील विविध भागात टप्प्याटप्याने जप्तीची कारवाई सुरू करणेत येत आहे. तरी थकबाकीदरांनी कराची रक्कम त्वरित भरावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रभागनिहाय थकबाकीदारांची यादी तयार केली असून गाळे सील करणे, थकीत देयकांवर कठोर कारवाई करणे ही प्रक्रिया वेगाने सुरू आहे. कारवाई टाळायची असल्यास तत्काळ थकबाकी भरावी. अन्यथा मोहीम आणखी तीव्र केली जाणार आहे. वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्याने आम्हाला जप्तीची करवाई नाइलास्तव करावी लागत आहे. संबंधितांनी थकबाकीदारानी स्वयंस्फूर्तीने थकबाकी भरावी व जप्तीची कारवाई टाळवी, असे आवाहन वैजापूर नगर परिषदेचे मुख्यधिकारी बी.यु. बिघोत यांनी केले आहे.











