वैजापूर : वैजापुरात तब्बल ७३ टक्के मतदान वैजापूर, (प्रतिनिधी) : बारा प्रभागांतील २३ नगरध्यक्षपदासाठी काल झालेल्या मतदान प्रतिस साडेसात ते साडेतीन वाजेपर्यंत अकरा हजार ३०२ पुरुष व अकरा हजार ७३८ वी अशा सुमारे २३ हजार ४० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
शहरातील अनेक मतदान केंद्रांवर रात्री सात वाजेनंतरही मतदान सुरू होते.
अखेर सरा-सरी ७३ टक्के मतदानाची नोंद झाली. किरकोळ प्रकार वगळता मतदानादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. वैजापूर शहरात मतदान प्रक्रियेसाठी ४८ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी साडे सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. मात्र सुरुवातीचे दोन तास वगळता दिवसभर मतद्मांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. त्यामुळे बहुतेक सर्वच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा बघायला मिळाल्या.
बाजार समिती येथील मतदान केंद्र, दर्गा बेस, मौलाना आझाद शाळा, लोकमान्य टिळक शाळा आदींसह अनेक मतदान केंद्र गर्दीने फुलले होते. भाजपाचे नगरध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांनी शहरातील एका केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. शिवसेनेचे उमेदवार संजय बोरनारे यांनी मौलाना आझाद प्राथमिक शाळा येथे मतदान केले.
मतदाराच्या संथ गतीने ज्येष्ठ नागरिकांचे हाल :
ते साडे अकरा या वेळेत २०. ३५ टक्के, दिड निवडणूक विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, सकाळी साडे सात वाजेपर्यंत ३६.८६ टक्के व साडे तीन वाजेपर्यंत ५४. ४२ टक्के मतदानाची नोंद झाली. अनेक केंद्रावर अतिशय संथ गतीने मतदान प्रक्रिया सुरू राहिल्याने ज्येष्ठ नागरिक, महिलांचे हाल झाले.
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अरुण जन्हाड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भागवत बिघोत व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील सावंत लक्ष ठेवून होते. पोलिस निरिक्षक सत्यजित तयतवाले यांच्या सगळ्या तगड्या पोलीस पोलीस बंदोबस्तात निवडणूक प्रक्रिया शांततेत राबवण्यात आली.















