वैजापूर, (प्रतिनिधी) : पंचायत समितीच्या सभापतीपदी संवंदगाव गणातील शिवसेना सदस्या वंदना बाळू शिंदे यांची तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिऊर गणातील सोनाली किशोर जाधव यांची मंगळवारी (दि. १०) रोजी बिनविरोध निवड करण्यात आली.
वैजापूर पंचायत समितीमध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाशी युती केली. या पक्षाचे एकमेव सदस्य यांची उपसभापती पदावर लॉटरी लागली. सभापती पदासाठी महालगाव गणातील भाजपच्या सदस्या शीतल राहुल आल्हाट व उपसभापती पदासाठी लाडगाव गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राहल बाबासाहेब लांडे यांनी देखील आपले उमेदवारी अर्ज पिठासीन अधिकारी डॉ. अरुण जहहऱ्हाड यांच्याकडे दाखल केले होते.
मात्र, दिलेल्या वेळेत त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने वंदना शिंदे यांची सभापती म्हणून तर सोनाली जाधव यांची उपसभापती म्हणून निवड झाल्याचे डॉ. जन्हऱ्हाड यांनी घोषित केले. या सभेला सर्व सोळा सदस्य उपस्थित होते. वैजापूर पंचायत समितीत शिवसेना (शिंदे गट) सात सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस चार, भाजप दोन, शिवसेना (उबाठा) एक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) एक व अपक्ष एक असे संख्याबळ आहे.
यावेळी शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, जिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप व माजी नगराध्यक्ष साबेरखान, रामहरी जाधव, राजेंद्र साळुंके, सुभाष तांबे, भागीनाथ मगर, दीपकसिंह राजपूत, श्रीराम गायकवाड, हुसेन शेख, सुनील कदम, अंकुश हिंगे, प्रकाश शेळके, अमोल बावचे, पारस घाटे आदींची यावेळी उपस्थिती होती.















