महाराष्ट्राचे प्रसिद्ध ज्योतिषी संत माधवशास्त्री अग्निहोत्री यांचे वैकुंठ निर्वाण

Foto
जालना ( प्रतिनिधी) श्री क्षेत्र देऊळगाव राजा येथील वैदिक संस्कृतीचे श्रेष्ठ अशी यज्ञपरंपरा अखंड १० पिढ्यांपासून अग्निहोत्र व्रतसेवा श्री लक्ष्मी व्यंकटेश चरणी अत्यंत कठीण नियमात अग्निहोत्र व्रत परंपरा सांभाळून अत्यंत निष्ठेने यज्ञ नारायणाची सेवा करून आहिताग्नी माधव राजेश्वर अग्निहोत्री यांचे संन्यास पद्धतीने नारायण चरणी वैकुंठ निर्वाण झाले. त्यांचे वय ७६ वर्षे होते. 

अग्निहोत्री महाराजांनी १९७५ पासून अग्निहोत्र व्रत दीक्षा घेऊन ५१ वर्षे अखंड अग्निहोत्र सेवा पूर्ण केली. भारतीय परंपरेप्रमाणे ब्रह्मचर्य व गृहस्थाश्रम वानप्रस्थ आणि संन्यास ग्रहण करून त्यांनी चार ही आश्रम पूर्ण केले हिमालयात श्री केदारनाथ पासून कांची रामेश्वरम पर्यंत अनेक यज्ञ त्यांनी जनकल्याणासाठी केले विशेष म्हणजे महाराष्ट्रातील
अनेक उद्योजक राजकारणी डॉक्टर लेखक कलाकार तरुणवर्ग आणि सामान्य लोकांना ज्योतिष्य मार्गदर्शनाने त्यांनी जीवनाला योग्य मार्गदर्शन केले. 

दिल्ली येथे महान तपस्वी श्री महेश योगीजी आणि श्री श्री रविशंकरजी यांच्या आश्रमात जनकल्याण हेतू अग्निहोत्र यज्ञ संपन्न केले. त्यांच्या यज्ञ कार्याच्या गौरव म्हणून स्व. माननीय माजी पंतप्रधान अटलजी वाजपेयी तसेच स्व. पंतप्रधान इंदिरा गांधीजी यांनी आपल्या निवासस्थानी निमंत्रित करून त्यांचा विशेष सत्कार केला होता.