पैठण पंचायत समितीच्या सभापतीपदी वैशाली बोंबले, उपसभापतीपदी संजय लघाने बिनविरोध

Foto
पैठण (प्रतिनिधी) खासदार संदिपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीवर १८ पैकी १७ सदस्य निवडून आणून निर्विवाद बहुमत मिळवले आहे.

पंचायत समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती निवडीसाठी निर्वाचन अधिकारी प्रवीण फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार वैशाली कांबळे, कैलास बहुरे यांच्या उपस्थितीत निवडणूक
प्रक्रिया पार पडली. सभापतीसाठी वैशाली बोंबले, उपसभापतीपदी संजय लघाने यांचे अर्ज आल्याने निर्वाचन अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सभापती पदासाठी वैशाली बॉबले व उपसभापती म्हणून संजय लघाने है बिनविरोध आल्याची घोषणा केली. सभापती, उपसभापती यांचे आमदार विलास घुमरे यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. सभापती व उपसभापती पदाची घोषणा होताच या ठिकानी शिवसेनेकांनी जल्लोष केला. 

फटाके फोडून फुलांची उधळण करून व पेढे वाटून आनंद व्यक्त फेला. दूध संघाचे राज्य संचालक नंदलाल काळे, शिवाजीनगर बँकेचे चेअरमन रवींद्र काळे, तालुकाप्रमुख अण्णासाहेब लबडे, दादा बारे, शेतकरी खरेदी विक्री संधाचे चेअरमन बाबुराव पडोळे, आप्पासाहेब पाटील निर्मळ संचालक श्री रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखाना व्हॉइस चेअरमन बळीराम औटे, श्री रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नंदकुमार पठाडे, उद्योजक राजेंद्र तांबे, विजय गोरे, अक्षय डुकरे, विनोद बोबले, बद्री बोंबले, जि प सदस्य नितीन तांबे, रेवनाथ कर्डिले, पुष्पा गव्हाणे, ज्योती काकडे, विक्रम भुजंग, जि प सदस्य पांडुरंग औटे, सुभाष मुळे, संजय थोरात, दादासाहेब गलांडे, प्रदीप नरके, सतीश आंधळे, नामदेव खरात, अक्षय जायभाय, अनिकेत धारकर, मिटू ननावरेंसह शिवसैनिक उपस्थित होते.