कन्नड, (प्रतिनिधी) : वंचित बहुजन आघाडोच्या वतीने विविध मागण्यांसाठी १८ मे रोजी कन्नड तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील एससी एसटी, ओबीसी आणि इतर सर्वच आरक्षणधारकांना खुल्या प्रवर्गातील आरक्षणावर हक्क सांगता येणार नाही, असा निर्णय घेतला. ही राज्य सरकारची दुटप्पी भूमिका असून जाणीवपूर्वक आरक्षण संपविण्यासठी हा सगळा खटाटोप सुरु असत्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सरकारने गॅस, पेट्रेल, डिझेलचे भाव वाढवून सर्वसामन्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे.
कांद्याचा प्रश्न सध्या गंभीर बनला आश्वासन आहे, शेतकरी हतबल झाले आहेत. या बाबीचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करण्यात येत असून, सरकारने आपली भूमिका सुधारून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
तहसीलदार सारिका भगत यांनी निवेदन स्वीकारून आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आंदोलकांना दिले. जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हाउपाध्यक्ष साहेबराव चौतमल, जिल्हासंघटक देविदास राठोड, राजन कीर्तने, अशोक खिल्लारे, तालुकाध्यक्ष सुनिल सिरसाठ, ईश्वर गायकवाड, धर्मा मोरे, महिलाध्यक्ष विद्याताई दिवेकर, बळीराम पवार, रईस सौदागर आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.









