पैठण (प्रतिनिधी) आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर, पैठण येथे बालदिन अभिव्यक्ती सप्ताह, जननायक बिरसामुंडा जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने जनजाती गौरव पंधरवडा उत्साहात संपन्न झाला आहे. या दोन्ही कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या सोबतच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळाप्रवेश दिन (विद्यार्थी दिन) साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला १५० वर्षे पुर्ण झाले असल्याने त्याअनुषंगाने वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे शिवराज धनसुरे यांच्या समवेत सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी गायन
केले. या शुभ प्रसंगी जननायक बिरसामुंडा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक भास्कर व भारतरत्न कुलकर्णी, प्रमुख मार्गदर्शन मनोज शिंगारे व विकास खर्डेकर
यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
त्यानिमित्ताने डॉ. आंबेडकर यांचे जीवन, शिक्षण व कार्य तसेच जननायक बिरसामुंडा यांचे जीवनचरित्र यावर आधारित भाषणस्पर्धा घेण्यात आली. भाषण स्पर्धेत श्रावणी पठाडे, तेजश्री माचेवाल, आदिती येळे, धनश्री भुसारे, भक्ती जाधव, वैष्णवी दिलवाले, रोशनी खापरे, संस्कृती नाटकर, सर्वज्ञ दहिफळे यांनी सहभागी होऊन अतिशय उत्कृष्ट अशी भाषणे सादर करत विद्यार्थ्यांचे अवधान राखले. सोबतच या भाषणानंतर प्रश्न मंजुषा घेण्यात आली.
वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला १५० वर्षे पुर्ण होत असल्याने त्याविषयी अनभिज्ञ असलेली माहिती विलास खर्डे कर यांनी सांगितली तर मनोज शिंगारे यांनी बिरसामुंडा यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान विशद केले. अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांनी यातून बोध घेऊन थोरांची चरित्रे आपल्या जीवनात अंगीकारावी असे अवाहन करून पुढील सप्ताहास शुभेच्छा दिल्या. सुदाम पोल्हारे यांनी लक्षवेधी व सुंदर असे फलक रेखाटन केले होते. कार्यक्रमाचे अतिशय अभ्यास पुर्ण असे सुत्रसंचलन प्रमोद काकडे यांनी केले तर आभार श्रीमती प्रियंका निकाळजे यांनी मानले.
https://epaper.sanjwarta.ini Powered By: Vrudhee Solutions















