वारकऱ्यांसाठीच्या बोअर पंपाला लागले पाणी ; ग्रामस्थांचा जल्लोष

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : तालुक्यातील विहामांडवा सर्कल येथील सालवाडगाव येथून दि. ८ जुलै रोजी चंद्रसेन महाराज यांच्या मार्गदर्शना खाली पंढरपूर येथील आषाढी महा उत्सवात सहभागी होण्यासाठी २०० वारकऱ्यांची पायी दिंडी निघाली. बीड जिल्ह्यातील पाटोदा परीसरातील बांगर वस्तीजवळ दिंडी चे स्वागत करण्यात आले.

बांगर वस्तीतील ग्रामस्थ यांनी चंद्रसेन महाराज यांच्याकडे आग्रह धरला की दिंडी तील वारकऱ्यांसाठी व गावकऱ्यांसाठी सार्वजनिक पिण्याच्या पाण्यासाठी बोअर पम्प सुरु करण्याची इच्छा आहे. योग्य जागेसाठी चंद्रसेन महाराज यांच्याकडे आग्रह धरला महाराजांनी योग्य जागा दाखविली दाखवलेल्या जागेवर गावाकरांनी तेथे बोअर पम्प उभारणीचा निर्णय घेतला. यावेळी बोअर पंपातुन पाणी बाहेर पडले असता गावकर्यांनी जलमातेचा जयजयकार केला. 

पांडुरंगाच्या कृपेमुळे पाणी लागले असे या वेळी चंद्रसेन महाराज म्हणाले. बोअर पंपाचे पूजन पैठण येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश जोशी यांच्या हस्ते पूजन झाले. या वेळी बाळासाहेब बोडखे, नारायण गाभूड, नामदेव जगताप, बाबासाहेब ठोंबरे, अनिल जाधव या सह ग्रामस्थांनी जला ची उधळण करून पांडुरंगाचा जयजयकार केला.