गोदावरी नदीच्या पात्रात वाळूमाफियांनी धुमाकूळ घातला असून सर्वांचाच वरदहस्त लाभल्याने माफिया बेफाम सुटले आहेत. तालुक्यातील गोदापाञातील सर्वच वाळूपट्टे वीरगाव पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने पोलिसांच्या परवानगीशिवाय माफियांचे पानही हालत नाही. त्यामुळे सध्या वाळूपट्टयांवर वीरगाव पोलिसांचेच राज्य असून त्यांची वरकमाई जोरात सुरू असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील वाळूमाफियांनी गोदापाञात धुडगूस घातला असून राञंदिवस वाळूचा बेसुमार उपसा सुरु आहे. तालुक्यातील अव्वलगाव, बाभूळगावगंगा, भालगाव, हमरापूर, पुरणगाव, नांदूरढोक, सावखेडगंगा, डोणगाव, भालगाव, नागमठाण आदी गोदापाञातील वाळूपट्टयातून बेसुमार उपसा सुरु आहे. हप्तेखोरीच्या माध्यमातून माफियांनी गोदावरी पाञावर कब्जा केला आहे. वाळू उपसा करण्यासाठी माफियांना अलिखित परवानगीच मिळाल्याने माफिया गोदाकाठच्या ग्रामस्थांचा विरोधही जुमानायला तयार नाही. तालुक्यातील गोदाकाठच्या वाळूपट्टयांवर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांपेक्षा वैजापूर व वीरगाव पोलिसांचे राज्य आहे.
गोदापाञातून अवैधरित्या वाळूची तस्करी करायची असल्यास महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांपेक्षा पोलिसांची अलिखित परवानगी महत्वाची मानली जाते. बरकतीच्या समजल्या या वाळूच्या धंद्यात अनेकांनी उड्या घेतल्याने ही बाब माफियांबरोबरच पोलिसांच्याही चांगलीच पथ्यावर पडली आहे. माफिया तर गब्बर झालेच. परंतु पगाराच्या कित्येक पट कमाई पोलिसांना मिळू लागल्याने त्यांनीही या धंद्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे पोलिस गोदावरी नदीच्या पात्रातच फिरतांना दिसून येतात. विशेषतः या धंद्यामुळे वीरगाव पोलिसांचे अधिक चांगभलं होत असल्याने त्यांना सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच वीरगाव पोलिस ठाणेप्रमुखांनी नुकताच नव्याने पदभार स्वीकारला. नव्याने रूजू झालेले ठाणेप्रमुख माफियांच्या मुसक्या आवळतील. अशी अपेक्षा गोदाकाठच्या ग्रामस्थांना होती. परंतु ग्रामस्थांच्या अपेक्षा फोल ठरल्या. उलट गोदापाञातील वाळूतस्करीसाठी पोलिसांकडून पाठबळच मिळत असल्याचे चिञ आहे.
अव्वलगाव येथील ग्रामस्थांनी दिला आत्मदहनाचा इशारा...
अव्वलगाव येथील वाळूपट्टयातून माफियांनी वीरगाव पोलिसांशी अर्थिक तडजोडी करून दोघांच्या संगनमताने अवैधरित्या वाळूची तस्करी सुरू असून संबधिताविरुध्द कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. निवेदन देऊनही कारवाई होत नसल्यामुळे अव्वलगाव येथील ग्रामस्थांनी गेल्या आठवड्यात आत्मदहनाचा इशारा दिल्याने वीरगाव पोलिस चांगलेच हादरले. त्यामुळे याबाबत वीरगाव पोलिस ठाणेप्रमुखांसह ग्रामस्थ व महसूल अधिकाऱ्यांची पोलिस ठाण्यात मॅरेथॉन बैठक होऊन कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आत्मदहनाचा निर्णय तात्पुरता मागे घेतला.
वाळूचा हा धंदा संपूर्ण अर्थशास्ञाच्या माध्यमातून सुरू...
वाळूचा हा धंदा संपूर्ण 'अर्थशास्ञाच्या' माध्यमातून सुरू आहे. यासाठी ठाण्यातील खास कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांकडे वेगवेगळ्या वाळूपट्टयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वाळूच्या माध्यमातून हे सर्व आक्रमक पटाईत होऊन माफियांना 'सुखदान' करून सर्वच ' विलासाने' जगतात. त्यामुळे सर्वच आलबेल सुरू आहे. ८ फेब्रुवारी बाभूळगावगंगा परिसरात गोदाकाठच्या ग्रामस्थांनी जवळपास १५ वाळूची वाहने अडवून आपल्या खदखदणा-या उद्रेकाला वाट करून दिली. जे काम संबंधित अधिकाऱ्यांनी करायला हवे होते. ते ग्रामस्थांनी करून दाखविले. हप्तेखोरीमुळे अन्य यंञणा बांधली गेल्याने ही यंञणा कारवाई करण्यास धजावली नाही. असे म्हणतात कोळशाच्या धंद्यात दलाली करणाऱ्यांचे हातही काळे होतात. तसेच काहीसे या वाळूच्या धंद्यातही झाले आहे. जोपर्यंत या धंद्यात संबंधित यंञणेचा माफियांवर वरदहस्त राहिल. तोपर्यंत वाळूतस्करीवर लगाम घालणे अशक्यप्राय आहे. सर्व यंञणाच माफियांच्या पाठिशी असेल तर गावकऱ्यांनीही कितीही आर्त टाहो फोडला तरी त्याचाही काहीच फायदा होणार नाही. यंञणाच भ्रष्ट झाल्याने गोदाकाठच्या गावकऱ्यांच्या अपेक्षा आता धुसर झाल्या आहेत. कुंपणच शेत खात असेल तर अपेक्षा कुणाकडून बाळगायची....? असेच काहीसे वाळूतस्करीबाबत झाले आहे. त्यामुळे बिनबोभाटपणे सुरू असलेला माफियांचा हा धुडगूस उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय गावकऱ्यांना पर्याय नाही.
देशी दारू अड्डे तसेच अवैध वाहतूक जोमाने...
हद्दीत अवैध धंदे जोमाने दिडशेच्यावर ब्लास्टीक ट्रक्टर झन्नमन्ना पत्ते मटका वृक्ष तोड वाहतूक अवैध दारू, हद्दीतील येणाऱ्या प्रत्येक गावात दोन ते तीन देशी दारू अड्डे तसेच अवैध वाहतूक , वाळूबरोबर जोमाने चालू असून थांबता थांबेना याकडे हे वरिष्ठ अधिकारी साहेबांनी जातीने लक्ष घालून हा चाललेला प्रकार थांबवा अशी चर्चा हद्दीतीमल नागरिकांमध्ये होते आहे