गंगापूर, (प्रतिनिधी): शहरात वसुबारस सण उत्साहात साजरा करण्यात आला. दिवाळीच्या सुरुवातीचा पहिला दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसुबारस दिनी शहरातील महिला वर्गाने गोमातेची क पूजन करून पारंपरिक पद्धतीने सण साजरा केला.
विविध वाड्या-प्रभागांमध्ये सकाळपासूनच महिलांनी गोमाता व वासराचे सुंदर सजवलेले पूजनस्थान तयार केले. दुध, तूप, नैवेद्य अर्पण करून गोमातेची आरती करण्यात आली. यावेळी गोमातेचे रक्षण करा अशा घोषणांनी वातावरण दुमदुमले. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, नगर परिषद वसाहत, स्टेशन रोड, शिवाजी चौक, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी गोवंशाचे पूजन करत समृद्धीची कामना केली.
दिवाळीच्या या पहिल्या सणानिमित्त बाजारपेठेत महिलांची वाणसामुग्री, फुलं, सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली. वसुबारसनेच गंगापूरमध्ये दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला.
















