धुळे – सोलापूर महामार्गावरील जड वाहतूक असणार बंद
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) : श्रावण महिन्यानिमित्त वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर आणि खुलताबादच्या श्री भद्रा मारुती देवस्थान येथे दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी ग्रामीण पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला.
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील (क्र. ५२) जड वाहतूक १३ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर या कालावधीत पूर्णपणे बंद ठेवून ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. यंदा १३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या काळात श्रावणमास साजरा होत आहे. या काळात दर शनिवारी खुलताबाद येथे तर दर सोमवारी वेरूळ येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची अलोट गर्दी उसळते.
विशेषतः तिसऱ्या श्रावण सोमवारी (३१ ऑगस्ट) वेरूळच्या तीर्थकुंडातून कावडीने पाणी नेण्यासाठी भाविक गटागटाने पायी प्रवास करतात. हा संपूर्ण परिसर सोलापूर नवीन पर्यायी मार्ग वेरूळ कन्नडकडून खुलताबाद - दौलताबाद मार्गे ये-जा करणारी जड वाहने आता छत्रपती संभाजीनगर - शरणापूर फाटा- माळीवाडा कसाबखेडा फाटा या मार्गाने कन्नडकडे जातील.
फुलंब्रीहून खुलताबाद वेरूळ कन्नडकडे जाणारी वाहने ही छत्रपती संभाजीनगरला येऊन शरणापूर फाटा मार्गे जातील. वैजापूरकडून वेरूळ-खुलताबाद मार्ग फुलंब्रीकडे जाणारी वाहने आता वैज वैजापूर शिवूर पाचपीरवाडी शरणापूर - छत्रपती संभाजीनगर मार्गाने फुलंब्रीकडे जातील.
धुळे राष्ट्रीय महामार्गावर येत असल्याने आणि खुलताबाद ते फुलंब्री या. मार्गावर नेहमीच जड वाहनांची मोठी वर्दळ असल्याने अपघाताची दाट शक्यता असते. त्यामुळे वाहनधारकांनी प्रशासनाला सहकार्य करत पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.














