उपमहापौरांना लिहिता येत नाही 'महाराष्ट्र', सीएम चषकाच्या जाहिरातीत घोडचूक

Foto

औरंगाबाद - अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशासोबत सेल्फी घेऊन टिकेचे धनी झालेले औरंगाबाद शहराचे उपमहापौर विजय औताडे आता त्यांच्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तसेच उपमहापौर विजय औताडे यांनी आपल्या मराठी लेखनातले अज्ञान जाहिरातीतून दाखवून दिले आहे. जाहिरातबाजीतून प्रसिद्धी मिळवण्याचा उत्साहीपणा त्यांना चांगलाच अंगलट आला असून सीएम चषकाच्या जाहिरातीत त्यांना "महाराष्ट्र" लिहिता आले नाही.

 

भारतीय जनता पक्षाच्या वतीने सीएम चषकाच्या निमित्ताने लोकसभा आणि विधानसभा मतदार संघामध्ये विविध कला आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जाहिरातींचा सपाटा लावला आहे. मात्र जाहिरातींच्या अतिउत्साहीपणामुळे त्यांना त्यांच्या चुकाही दिसत नाही, अशी स्थिती आहे. उपमहापौर विजय औताडे यांना आपल्या या जाहिरातीत महाराष्ट्राचा महारष्ट्रकेला आहे.