स्पर्धा परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल तरुणांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): तालुक्यातील खेडी लिहा येथे विविध क्षेत्रात स्पर्धा परीक्षेतून यश संपादन केल्याबद्दल तरुणांचा गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला. खेडी लिहा येथे सालाबादपमाणे दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात गावातील जे युवक युवती मागील वर्षभरात विविध विभागात नोकरीला म्हणून रुजू झाले. किंवा उच्च शिक्षण संस्थेत दाखल झाले. तथा ज्या प्राध्यापक शिक्षकांना विविध पुरस्कार मिळाले अशा सर्वांचा समस्त गावकऱ्यांच्या वतीने सहपालक सत्कार करण्यात आला. शिक्षण घेत असलेल्या गावातील तरुणांना प्रेरणा मिळावी. या उद्देशाने सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व अन्य अशा विविध क्षेत्रात खेडी गावाचे नाव रोशन करणाऱ्या गावातील प्रांजली डापके, रवी डापके, विशाल कळात्रे, ऋतविक कळात्रे, ऋषिकेश जनार्धन कळात्रे, यश डापके, सागर साबळे, अनिकेत डापके, संतोष कळात्रे, योगेश्वर कळात्रे, संतोष भोंबे, कृष्णा कालमिले, मारुती दौड या यशस्वी तरुणांचा सन्मान सर्व गावकऱ्यांच्या समोर करण्यात आला. याप्रसंगी प्रा. अण्णा कळात्रे यांना राज्य शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. निवृत्त फौजी शंकर कळात्रे यांचाही सत्कार करण्यात आला.

प्राचार्य डी. आर. कळात्रे यांनी सर्व यशस्वी तरुणांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या मार्गदर्शनात आपल्या गावातील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये या विद्यार्थ्यांप्रमाणे उत्तुंग यश संपादन करून येणाऱ्या भावी पिढीस तुम्ही प्रेरणा द्या. आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा, की तुम्ही केलेल्या अभ्यासातील सातत्य व जिद्द आणि कष्टांमुळे हे यश संपादन केले आहे. यानंतर त्यांनी गावातील अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या उत्पन्नातून विविध क्षेत्रात अभ्यासाचा प्रयत्न करणाऱ्या या विद्यार्थ्यांना मदत करावी व सामाजिक बांधिलकी जोपासावी. जेणेकरून शेवटच्या घटकापर्यंत आपल्या गावातील विकास होईल. आणि आम्ही सुद्धा गावातील नागरिक या नात्याने शक्य आहे.

 तेवढे आर्थिक मदत करून अनेक होतकरू गोरगरिब विद्यार्थ्यांना मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. असे आश्वासन गावातील अनेक विविध क्षेत्रातील नोकरदार कर्मचाऱ्यांच्या वतीने दिले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक सुभाष अण्णा डापके हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून गावचे सरपंच बाजीराव डापके, पोलीस पाटील दादाराव कळात्रे, गणपतराव डापके, पांडुरंग डापके, गंगारामबाबा कळात्रे इत्यादी उपस्थित होते.

 प्रा. डॉ सदाशिव डापके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. बालाजी डापके, रामदास कदम, गंजीधर डापके, शंकर डापके, गटविकास अधिकारी नवनाथ डापके यांनी मनोगत व्यक्त केले. कठोर मेहनतीशिवाय व सातत्याशिवाय जीवनात यश नाही असे सर्व वक्त्यांनी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.

राजू डापके यांनी सूत्रसंचालन करून रंगत आणली. पंढरीनाथ डापके यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रा. कृष्णा डापके, पुरुषोत्तम डापके, प्रा.एम. एस. डापके, विश्वनाथ डापके, सोनाजी डापके, ज्ञानेश्वर साबळे, दीपक कळात्रे, जगण डापके, संतोष डापके, गणपत साबळे, सुभाष साबळे, प्रा. सुदाम कळात्रे, प्रा. राजू डापके, अमोल गव्हाणे, देवदास कळात्रे, रामेश्वर कळात्रे, विश्वास कळात्रे व मोठ्या संख्येने गावातील तरुण विद्यार्थी व गावकरी मंडळी उपस्थित होती. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. गोपीनाथ डापके, संदीप डापके, डी. जी. कळात्रे, रामा कळात्रे, दिगंबर डापके, प्रा संजय डापके, अॅड काशीनाथ डापके, जनार्दन डापके, प्रमोद डापके, सचिन डापके व गावातील तरुण मंडळींनी परिश्रम घेतले.