गटविकास अधिकारी यांचे आवाहन
सिल्लोड, (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत वांगी बुद्रुक येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत बुधवारी (७ जानेवारी बुधवारी रोजी विभागीय आयुक्त यांच्या संकल्पनेतील व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवस गावकऱ्यासोबत (ग्रामदरबार नाविन्यपूर्ण उपक्रम) आयोजन करण्यात आले.
महात्मा गांधीजीच्या स्वप्नातील खेडी स्वयंपूर्ण व्हावी, त्यातून गावाचा विकास व्हावा, प्रत्येक नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहोचावी व योजनाचा लाभ नागरिकांना व्हावा यासाठी सौ. ज्योती लक्ष्मण साळवे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली तसेच रत्नाकर पगार गटविकास अधिकारी पंचायत समिती सिल्लोड यांच्या प्रमुख उपस्थितीत एक दिवस गावकऱ्यासोबत हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी बोलताना पगार म्हणाले की मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जास्तीत जास्त लोकसभा देऊन सहकार्य करावे. गाव विकासासाठी स्वतः ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, गावाचा विकास गावकऱ्यांच्या हाती असतो शासनाने एखादी योजना मंजूर करून काम पूर्ण केले. तर त्यात सातत्य व शाश्वत टिकविणे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे असते गावात अनेक प्रकारच्या प्रवृत्तीची लोक असतात. गावात सार्वजनिक व शासकीय मालमत्ता टिकवायच्या ही खराब करायचा याच्यावर ग्रामस्थांनी लक्ष दिले. तर गावात सातत्य व स्वच्छता राहिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शासन मात्र योजना राबवून मालमत्ता तयार करून देऊ शकते.
परंतु ती टिकवण्याची जबाबदारी ग्रामस्थांची असते सतत शासकीय मालमत्ता खराब करायचे व शासनाला निधी मागायचा हे उचित नाही आहे. गावात जर विकास साधायचा असेल तर ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन गावात मालमत्ता व्यवस्थित ठेवावी. तसेच जास्तीत जास्त ग्रामस्थांनी विविध योजनांची माहिती घेऊन गाव विकास साधावा. यावेळी केंद्रशासन व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती विविध विभागातील विभागाप्रमुख यांनी विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.
यावेळी सुनील सूर्यवंशी कृषी अधिकारी, साहेबराव शेळके विस्तार अधिकारी पंचायत, सहाय्यक कृषी अधिकारी विठ्ठल सतुके, पशु विभाग, आरोग्य विभाग, अंगणवाडी पर्यवेक्षक, धनश्री बागुल कनिष्ठ शाखा अभियंता सिंचन, केंद्रप्रमुख महाजन, मुखाध्यापक सुनील सुसुंद्रे, अविनाश चौधरी कनिष्ठ शाखा अभियंता पाणीपुरवठा, केशवकांत बुलबुले गट समन्वयक स्वच्छ भारत मिशन (ग्रा), लीलाधर कोळी ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम पंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी, आशा अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश साळवे, गणेश साळवे, नईम पठाण, सागर साळवे व ग्रामस्थ उपस्थित होते.














