नगिनापिंपळगाव फाट्याजवळ विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी अडवल्या बसेस

Foto
वैजापूर : वैजापूर-लाडगाव रोडवर नगिनापिंपळगाव फाट्याजवळ विद्यार्थ्यांनी बस वेळेवर न आल्याने आज सकाळी १० वाजता तीन बस अडवल्या. या मार्गावर दहा ते बारा गावातील विद्यार्थी शिक्षण घेण्याकरिता प्रवास करतात. वारंवार तक्रार करून देखील एस.टी. बस थांबवल्या जात नाहीत. त्यामुळे वेळेवर पोहोचू शकत नसल्याने शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. एस.टी. महामंडळाच्या मनमानी कारभाराला वैतागून आज विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी रास्ता रोको करत तीन बस अडवल्या. वैजापूर पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.