भेंडाळा येथील ग्रामस्थांची आमदार आदित्य ठाकरेंकडून विचारपूस

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) : गंगापूर तालुक्यातील मौजे भेंडाळा येथे शिवसेना नेते, माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी शेतकर्याची भेट घेऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. गावाच्या पारावर शेतकर्यांसोबत बसून त्यांनी अत्यंत आपुलकीने प्रत्येकाची विचारपूस केली. 

दुष्काळामुळे शेतीचे झालेले नुकसान, हाताला काम नसल्यामुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आणि ऐन दिवाळीच्या सणात घराघरात निर्माण झालेल्या अडचणी जाणून घेतल्या. दिवाळीचा सण उंबरठ्यावर असताना शेतकर्यांच्या घरात आनंदाऐवजी चिंतेचे वातावरण आहे. 

शेतकर्यांच्या व्यथा केवळ ऐकून न घेता त्यांच्या परिस्थितीची जाणीव ठेवत आदित्य ठाकरे यांनी त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे, आमदार अंबादासजी दानवे, उपजिल्हाप्रमुख अंकुश सुंब तालुकाप्रमुख अविनाश पाटील, सुभाष कानडे, कारभारी दुबिले, पोपटराव गाडेकर आदी उपस्थित होते.