वैजापूर, (प्रतिनिधी) : विणकर दिनानिमित्त साळी समाजाचे आद्य दैवत व वस्त्र निर्माते भगवान जिव्हेश्वर यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून वैजापूर येथील साळी समाज बांधवांनी विणकर दिन साजरा केला.
वैजापूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर व भगवान जिव्हेश्वर मंदिर येथे साळी समाज बांधवांच्या वतीने विणकर दिन निमित्त समाजाचे जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक अशोकराव धसे गुरुजी यांनी दिनकर दिनाचे महत्त्व व त्याबद्दल सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
याप्रसंगी सेवानिवृत्त आदर्श शिक्षक अशोक मांजरे, सेवानिवृत्त शिक्षक अशोक धसे, साळी समाज अध्यक्ष समीर लोंढे, अविनाश कळंके, सुनील गुळसकर, किशोर आहीरे. विलास रामैया, ध्रुवाशेठ गुळसकर, राहुल सरोदे, आशिष सरोदे लक्ष्मीकांत कांबळे, माणिक सातपुते, गणेश कांबळे, महेश अहिरे, रोशन धसे, चंद्रकला मांजरे, कांबळे आजी यांच्यासह भजनी मंडळ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.












