बिडकीन मध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी; उपचारादरम्यान एका युवकाचा मृत्यू

Foto
 बिडकीन मध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी; उपचारादरम्यान एका युवकाचा मृत्यू
बिडकीन (प्रतिनिधी): बसस्थानक
परिसरातील वाढदिवसाच्या व दीपावली शुभेच्छा बॅनरच्या वादातून बिडकीन येथे गुरुवारी २३ ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या सुमारास दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीमुळे एका गटाचा (१७ वर्षीय) तरुणाचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी योगेश मारुती दाणे (रा. बिडकीन) यांच्या फिर्यादीवरून बिडकीन पोलिसांनी ३० ते ३५. जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील मृत युवक हा विद्यार्थी असून तो अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे शिक्षण घेत होता. दिवाळीच्या
सुट्ट्यामुळे तो बिडकीनमध्ये घरी आला होता. जखमी तनु चोरमारे याची मृत्यूची बातमी कळतच शुक्रवारी दुपारपासून गावात बाजारपेठ बंद होती. बिडकीन गावात तणावपूर्ण शांतता होती. योगेश मारुती दाणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझा भाचा ऋतिक अशोक धर्मे याने बिडकीन बसस्थानक परिसरात दीपावलीच्या शुभेच्छा बॅनर लावले होते. दुसरे गटातील ऋषिकेश उर्फ चिमण जाधव यांचा वाढदिवस असल्यामुळे  वादाचे बॅनरवरून वादावादी रूपांतर भांडणत झाले.

या भांडणांमध्ये तन्मय चोरमारेचा मृत्यू झाला. याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात ऋषिकेश जाधव. राहुल ठाणगे, सागर ठाणगे, प्रदीप ठाणगे, संतोष ठाणगे यांच्यासह अन्य ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली बिडकीन पोलीस सखोल तपास करीत आहे. शोकाकुल वातावरणात तन्मय गणेश चोरमारे (वय १७) यांच्यावर शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास शेकटा रोडवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.